शिवजन्मोत्सवानिमित्त आधार फाउंडेशनतर्फे विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा वेदांत भोयर प्रथम, मजीद बेग मुगल द्वितीय, कु. कल्याणी चांदेकर तृतीय
शिवजन्मोत्सवानिमित्त आधार फाउंडेशनतर्फे विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा
वेदांत भोयर प्रथम, मजीद बेग मुगल द्वितीय, कु. कल्याणी चांदेकर तृतीय

हिंगणघाट :
शिवजन्मोत्सवाच्या पावन पर्वावर आधार फाउंडेशनच्या वतीने विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतील नामवंत वादविवादपटूंनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर केला.
स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. नंदोरी रोड येथील साई मंदिर हॉल येथे ही स्पर्धा पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ वांदिले होते. उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक अनिल राऊत उपस्थित होते.
यावेळी आधार फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्षा सौ. माधुरीताई विहीरकर, सचिव सुनील डांगरे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून मेनलाईन अकॅडमीचे संचालक चंद्रकांत नणंदकर, टार्गेट अकॅडमीचे संचालक सुशांत बाराहाते आणि यशोज्ञान स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक योगेश वानखेडे उपस्थित होते.
या स्पर्धेत नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आदी विदर्भातील विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी, युवक व युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
“नैतिक नेतृत्वाचा अभाव आजच्या समाजातील मोठी समस्या आहे / नाही” या विषयावर स्पर्धकांनी आपले सखोल, परखड आणि विचारप्रवर्तक मते मांडली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे —
प्रथम क्रमांक: वेदांत भोयर,
द्वितीय क्रमांक: मजीद बेग मुगल,
तृतीय क्रमांक: कु. कल्याणी चांदेकर.
प्रोत्साहनपर बक्षीस साहिल फटिंग व कु. श्रावणी अंबुलकर यांनी पटकावले.
विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण नामवंत विचारवंत अॅड. इब्राहिम बख्श व प्रा. अभय दांडेकर यांनी तटस्थपणे केले.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष अतुलभाऊ वांदिले म्हणाले की, “वादविवाद स्पर्धांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचार आजच्या तरुणाईपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.”
कार्यकारी अध्यक्षा सौ. माधुरी विहीरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आधार फाउंडेशन सामाजिक व शैक्षणिक कार्यात सदैव अग्रेसर असून शिवजयंतीनिमित्त आयोजित ही स्पर्धा विदर्भातील वक्तृत्व क्षेत्रातील मानाची स्पर्धा आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीधर काचोळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुहास घिनमिने यांनी मानले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत नगराळे, चंद्रकांत नणंदकर, प्रा. योगेश वानखेडे, सुशांत बाराहाते यांच्यासह आधार फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.






