सामाजिक

शेडगाव येथे धनोजे कुणबी समाज बांधवांची बैठक; संघटन बळकट करण्यावर भर


शेडगाव येथे धनोजे कुणबी समाज बांधवांची बैठक; संघटन बळकट करण्यावर भर

समुद्रपूर : धनोजे कुणबी विकास प्रतिष्ठानच्या वतीने सद्गुरू विदेही संत जगन्नाथ बाबा सेवा ट्रस्ट, शेडगाव येथे धनोजे कुणबी समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. समाजातील विखुरलेपणा कमी करून संघटन अधिक मजबूत करणे आणि समाजकार्यास दिशा देणे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत प्रतिष्ठानची उद्दिष्टे, कार्यपद्धती तसेच समाज संघटना उभारणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील तरुण पिढीला संघटनात्मक कार्यात सहभागी करून घेणे, समाजातील परस्पर ओळख वाढविणे तसेच शिक्षण, सामाजिक एकात्मता आणि विकासाभिमुख उपक्रम राबविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
विशेषतः विविध ठिकाणी विखुरलेल्या धनोजे कुणबी समाजाच्या कुटुंबांशी संपर्क साधून त्यांना एकत्र आणण्यासाठी नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून समाजाची ओळख दृढ करणे, युवकांना मार्गदर्शन करणे तसेच समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
चर्चा सत्रादरम्यान सद्गुरू विदेही संत जगन्नाथ बाबा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष गजानन आसुटकर यांचा पत्नी गीताबाई आसूटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा देत समाजकार्यातील योगदानाबद्दल गौरव व्यक्त केला.
या बैठकीस हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील धनोजे कुणबी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाज संघटन अधिक बळकट करण्यासाठी गावागावांत संपर्क मोहीम राबविणे, समाज बांधवांची नोंदणी करणे तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीचे संचालन संदीप देरकर यांनी केले, तर शेषराव तुळणकर यांनी आभार मानले.

या वेळी डॉ. हेमंत इसणकर, सुमित जीवतोडे, गजानन पारखी, सुधाकर भोंगरे, शेषराव तुळणकर, राम काळे, सारंगधर विरूळकर, प्रशांत चवले, प्रभाकर वाढई, दिनकर बोबडे, देविदास तुळणकर, बाळकृष्ण मोहितकर, अशोक तिखट, विकास आसुटकर, सचिन तुळणकर, दादाराव एकरे, दिवाकर हेपट, मनोज ठक, निलेश कापसे, पांडुरंग वासाडे, वसंतराव गोचे, नरेश पावडे, धनंजय डाहुले, संजय आडकीने, मोरेश्वर धोटे, महादेव धोटे, कुणाल आडकीने, हनुमान आसुटकर, राजेंद्र आसुटकर, अंकित आसुटकर, पंकज आसुटकर, प्रमोद डूकसे, बाबाराव घुगल, प्रकाश ठक, भूषण पिदुरकर, रंजित तुळणकर, अक्षय आडकीने, मंगेश बरडे, उमाकांत आडकीने, पांडुरंग डाहुले, अजय आसुटकर, प्रवीण पिदुरकर, बिजाराम काळे, मनोहर काळे, संदीप देरकर, अनिकेत महाकुलकर, धनराज हेपट, किशोर पावडे, योगेश आसुटकर, कुणाल पावडे, पुरुषोत्तम माथनकर, अश्विन धोटे, देवेंद्र आसुटकर, चंद उसरे, अमोल सूमटकर, पुरुषोत्तम सालवटकर, अमोल माथनकर, रुपेश घाटे, सुमित घाटे, अतुल वासाडे, जयंत धोटे, वामन सालवटकर, झोलबा उपरे, दत्तू उरकुडे, रामदास सोनटक्के, जितेंद्र आडकीने आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *