गिरड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मोहगांव येथील सरपंच विलास नवघरे यांच्या विकास कार्याचा गौरव
गिरड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मोहगांव येथील सरपंच विलास नवघरे यांच्या विकास कार्याचा गौरव

गिरड: मोहगांव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोहगांव,तावी ,रासा केसलापार वानरचुवा,या पाचही गावात ५ वर्षात भुतोना भविष्य असे विकास काम करणाऱ्या मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे यांच्या जिल्हा उत्कृष्ट सरपंच म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे यांच्या कार्याचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन गिरड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. यावेळी सरपंच राजु नौकरकर, उपसरपंच मंगेश गिरडे,माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य शेख ईस्राईल,अमोल पर्बत, राहुल गाढवे यांच्या उपस्थितीत सरपंच विलास नवघरे यांचा गौरव करण्यात आला.यावेळी सरपंच राजु नौकरकर म्हणाले की सरपंच विलास नवघरे यांनी संसाराचा गाढा व आपली पत्रकार तसेच समाजात कार्य , सरपंच संघटनेची मोठी जबाबदारी सांभाळून मेहनत जिद्द चिकाटी व गावासाठी गावातल्या लोकांसाठी काही तरी करायच मनता ईच्छा बाळगून शासनाच्या विविध योजनेतून आमदार समिर कुणावार यांच्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध करून त्यांनी ५ वर्षात भुतोना भविष्य असे विकास कामे केली आहे.तर माजी पंचायत समिती सदस्य शेख ईस्राईल म्हणाले की सरपंच विलास नवघरे यांनी त्यांच्या सोभावाने प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांचे मने जिंकून
प्रत्येक विकास कामांचा मंजूर करण्यापासून तर पुर्ण होण्यापर्यंत पाठपुरावा करून काम करून त्याची योग्य पद्धतीने अमलबजावणी करून गावाचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे सोबतच अधिकाऱ्यांसोबत ताळमेळ जळून गावातील नागरीकांच्या सरकारी सह विविध समस्या तत्परतेने सोळविणे अशी तालुक्यातच नाही तर जिल्हा ओळख निर्माण केली आहे. उपसरपंच मंगेश गिरड ग्रामपंचायत सदस्य राहुल गाढवे यांनी सुध्दा मनोगत व्यक्त करुन सरपंच विलास नवघरे यांच्या पुढिल कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राकेश बोबडे,ग्रामसेवक अखिल ढोबळे, संतोष पुरकाम, किशोर जाधव,मोहगांव येथील उपसरपंच सपनाताई बाभडे,ग्रामपंचायत सदस्य राजु परचाके, संदीप दातारकर, सुनिता वाघाडे, शिलाताई धारणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, माजी उपसरपंच वासुदेव मोघरे,गोविंदा बाभडे,मंगेश गारघाटे, अरूण ठाकरे, दौलत शाहरे, विलास राऊत, गोलू बांगरे,आदी प्रामुख्याने उपस्थितीत होते.






