ताज्या घडामोडी

नदी-नाले तुडुंब; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा पिपरीच्या पुलावरून पाणी; गावकऱ्यांची वर्दळ ठप्प


नदी-नाले तुडुंब; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

पिपरीच्या पुलावरून पाणी; गावाकऱ्यांची वर्दळ ठप्प 

समुद्रपूर : तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. जोरदार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

पिपरी व रासा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यामुळे गावकऱ्यांची ये-जा प्रभावित झाली आहे. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी धोका पत्करून पुलावरून जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील काळात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी नदी, नाले तसेच पुलांजवळ अनावश्यक गर्दी करू नये आणि पाण्याच्या प्रवाहातून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन तहसीलदार कपिल हाटकर यांनी केले आहे.

आपत्कालीन परिस्थिती अथवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने तहसील कार्यालय किंवा संबंधित पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असेही तहसीलदार हाटकर यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *