ताज्या घडामोडी

गिरड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथी साजरी


गिरड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथी साजरी

समुद्रपुर: तालुक्यातील गिरड येथील गुरुमाऊली सभागृहात  एकात्म मानववाद व अंत्योदयचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे महान विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच राजु नौकरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहगांव सरपंच विलास नवघरे,अरुणभाऊ मोटघरे,साहेबराव पाऊनफासे,रघुवीर पारधे,ग्रामपंचायत सदस्य संदीप दातारकर,संदीप शिवणकर,गणेश मुंगले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेच पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अरूण मोटघरे, रघुवीर पारधे, सरपंच राजु नौकरकर यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्यावर प्रकाश टाकत पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद हा विचार आजही राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरत आहे. वैचारिक कार्यक्रमांमधून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होत असे मत व्यक्त केले.यावेळी गिरड परीसरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *