धार्मिक

अयोध्या धामहून गिरडमध्ये चरणस्पर्श पादुका, श्रीराम मंदिरात होणार स्थापना : गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन


अयोध्या धामहून गिरडमध्ये चरणस्पर्श पादुका, श्रीराम मंदिरात होणार स्थापना : गावातून भव्य मिरवणुकीचे आयोजन

गिरड | प्रतिनिधी

अयोध्या धामवरून येणाऱ्या रामलल्लांच्या पवित्र चरणस्पर्श पादुका सोमवारी (दि. २३ फेब्रुवारी) गिरड येथे भक्तिमय वातावरणात दाखल होणार आहेत. यानिमित्त सकाळी ९ वाजता ढोल-ताशांच्या गजरात माऊली मंदिर ते श्रीराम मंदिर अशी भव्य चरणस्पर्श पादुका पदयात्रा काढण्यात येणार आहे.अयोध्या धामहून आणलेल्या पवित्र पादुकांच्या स्वागतासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यात्रेदरम्यान “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून, रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अध्यात्मिक भावनेने ओतप्रोत भरलेली ही यात्रा भाविकांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.पुरातन श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री. बलवंत गाठे, सचिव संदीप शिवणकर तसेच विश्व हिंदू परिषदेचे निर्भय पांडे यांनी सर्व रामभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.शुभ मुहूर्तावर गिरड येथील पुरातन श्रीराम मंदिरामध्ये चरणस्पर्श पादुकांची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. या पावन सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून, अयोध्या धामहून आलेल्या पादुकांच्या दर्शनाने भाविकांचा भक्तीभाव अधिकच दृढ होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *