गिरड येथील श्रीराम मंदिरातून ५८ रामभक्त अयोध्येला रवाना : पुरातन श्रीराम मंदिराचा पुढाकार: आमदार समिर कुणावार यांनी दिल्या शुभेच्छा
गिरड येथील श्रीराम मंदिरातून ५८ रामभक्त अयोध्येला रवाना : पुरातन श्रीराम मंदिराचा पुढाकार: आमदार समिर कुणावार यांनी दिल्या शुभेच्छा

समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील दोन दशके पुर्ण करुन तिसऱ्या दशकात प्रवेश करणाऱ्या पुरातन श्रीराम मंदिरात देवस्थानच्या वतीने मंदिरात नियमित येणाऱ्या राम भक्तांसाठी
गिरड श्रीराममंदिर ते अयोध्या राम मंदिर दर्शन हा श्रीराम भक्तांसाठी पहिल्याच अयोध्या यात्रेचा आयोजनाचा एक ऐतिहासिक व भावनिक क्षण अनुभवास आला. गिरड गावातून तब्बल ५८ रामभक्त पवित्र अयोध्या नगरीकडे दर्शनासाठी रवाना झाले.या शुभप्रसंगी श्रीराम देवस्थान मंदिराचे अध्यक्ष बलवंत गाठे, सचिव संदिप शिवणकर, माजी सरपंच राजु नौकरकर, माजी सरपंच विलास नवघरे, अरुण मोटघरे,गजानन गारघाटे,सुधाकर बाकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल गाढवे, विश्व हिंदू परिषदेचे निर्भय पांडे,प्रशांत ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य निलीमा खडके,सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कदिर आदींसह शेकडो राम भक्तांच्या उपस्थित मंदिरात महाआरती करून वाहनाची विधीव पूजन करण्यात आले. यावेळी “जय श्रीराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने रामभक्तांनी अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले.अयोध्येला निघालेल्या राम भक्तांचा सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा आमदार समिर कुणावार यांनी दिल्या. या कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. मान्यवरांनी रामभक्तांना शुभेच्छा देत सुखरूप प्रवास आणि दर्शनाची कामना केली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचे दर्शन घेणे हे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना अनेक रामभक्तांनी व्यक्त केली.या श्रीराम मंदिर देवस्थान कमिटीच्या उपक्रमामुळे गिरड परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.






