गिरड येथे रामजन्मोत्सवानिमित्त १४० वर्षांपासून सुरू आहे घोडायात्रा:२१० वर्षांपासून निरंतर सुरू आहे रामजन्मोत्सव
गिरड येथे रामजन्मोत्सवानिमित्त १४० वर्षांपासून सुरू आहे घोडायात्रा:२१० वर्षांपासून निरंतर सुरू आहे रामजन्मोत्सव
गिरड :गुढीपाडव्याच्या दिवसी अयोध्ये वरून श्रीराम प्रभुच्या पावन स्पर्शाने आलेल्या पादुकांची गावात भव्य मिरवणूक काढून रामजन्मोत्सवला सुरुवात करण्यात आली.हभप रुपेश महाराज तळवेकर यांच्या मधुर वाणीतून रोज रामचरितमानस ऐकविण्यात येत आहे.९ दिवस विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे रेलचेल असुन संपूर्ण गिरड नगरी राममय झाली आहे. वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गिरड येथे २१० वर्षांपूर्वी बांधलेल्या पुरातण श्रीराम मंदिराने तिसऱ्या शतकात पदार्पण केले आहे. येथील घोडा यात्रेचे हे १४० वे वर्ष आहे. येथील राम मंदिराचा पाया २१० वर्षे जुना आहे. येथे पैठणहून आलेल्या संत सीताराम महाराजांचा मठ होता. १८१५ मध्ये सीताराम महाराजांनी मठाचे श्रीराम मंदिरात रूपांतर केले. २१० वर्षांपासून पूजापाठ अखंड सुरू आहे. १४० वर्षांपूर्वी येथे रामनवमीनिमित्त घोडायात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा मंदिर निर्माणानंतर ७१ वर्षाने १८८६ मध्ये सुरू झाली. मंदिराचे बांधकाम १८१२ मध्ये सीताराम महाराज प्रवास करीत पैठण गावातून गिरड येथे आले. त्यांना गिरड गाव खूप आवडले आणि त्यावेळी गोपाळकृष्ण मंदिराजवळ गवताची झोपडी करून रामभक्ती सुरू केली. महाराजांनी येथे ३० वर्षे भिक्षा मागून वास्तव्य केले. सीताराम महाराजांनी आपल्या झोपडीत लाकडापासून बनवलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली रूपराम महाराज, रतीराम महाराज, अनंतदास महाराज, रामदास शास्त्री महाराज आदींनी या मंदिराचा कारभार हाती घेतला आणि १९६६ पासून विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली. शेतीच्या उत्पन्नावर रामजन्मोत्सव, घोडायात्रा उत्सव साजरा केला जातो. हे मंदिर आजही नवीनच आहे. आधुनिकता आणि हायटेक युगातही राम जन्मोत्सव व घोडायात्रेत दरवर्षी हजारो रामभक्त सहभागी होतात. यावर्षी २६ मार्चला १२ वाजता रामजन्मोत्सव व सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक काढून १४० वी सुप्रसिद्ध घोडा यात्रा काढण्यात येणार आहे.या वर्षी श्रीराम मंदिर देवस्थानला आमदार समिर कुणावार यांच्या पुढाकाराने क वर्ग तिर्थ श्रेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याने मोठे उत्साहाचे वातावरण असुन देवस्थान कमिटीच्या वतीने रामजन्मोत्सव, घोडा यात्रेची जय्यत तैयारी सुरू केली आहे.







