गिरड येथिल प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयात महाशिवरात्रीनिमित्त ध्वजारोहण:विविध कार्यक्रमाचे आयोजन
गिरड येथिल प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयात महाशिवरात्रीनिमित्त ध्वजारोहण:विविध कार्यक्रमाचे आयोजन

गिरड: येथिल प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या केंद्राच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्र संचालिका रमादीदी, किरण दिदी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन,दीपप्रज्वलन करून ध्वजारोहण करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.केंद्र संचालिका रमादीदी, किरण दिदी यांच्या हस्ते केक कापण्यात आला.या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक गोमेद पाटील,आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कवडुभाई संपूर्ण कार्यक्रमाबद्दल तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या स्थापने संबधी मार्गदर्शन करताना म्हणाले की ९९ वर्षापुर्वी शिवपरमात्मा बाबाच्या शरीरात प्रवेश करुन जगातील मानव कल्याणासाठी त्यांना पुढारी केले तेव्हा पासून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाची स्थापना झाली असून हे जगातील १४७ देशात कार्यरत आहे. आता कलीयुगाचा अंत सुरू झाली असून संगम युगाला सुरुवात झाली आहे.आपण सर्व जगातील बाबाचे लेकर आहो.यामुळे आपल्या हाताने चांगले कार्य घडावे हिच बाबाची इच्छा आहे.या सर्व गोष्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी हि संस्था जगातील १४७ देशातच विश्व शांतीसाठी काम करीत आहे. या सर्वांनी आपापल्या परीने सयोग द्यावा असे आवाहन केले.यावेळी सर्व मान्यवरांचा केंद्र संचालिका रमादीदी यांनी पुष्पगुच्छ व पुस्तिका देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राम गाठे, राहुल गाठे, विनायकभाई कापसे, नारायणभाई महल्ले, रमेशभाई डडमल,निळकंठभाई सातघरे, शामरावभाई कामडी, कवडुभाई पाटील, वैशाली गाठे रेखा बहन, रंजना बहन, अर्चना बहन, छबू बहन,यांनी सहकार्य केले आहे.






