सामाजिक

समुद्रपूर भूषण कै. शांताबाई देवरावजी जामुनकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शवशीतपेटीचे लोकार्पण


समुद्रपूर भूषण कै. शांताबाई देवरावजी जामुनकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शवशीतपेटीचे लोकार्पण

समुद्रपुर :येथील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या समुद्रपूर भूषण कै. शांताबाई देवरावजी जामुनकर यांच्या पवित्र स्मृतीप्रीत्यर्थ समाजोपयोगी उपक्रम म्हणून शवशीतपेटीचे लोकार्पण सोहळा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला.यामुळे मरावे परी किर्तीरुपी रहावे अशी ठेवण शांताबाई देवरावजी जामुनकर यांची होती. या प्रसंगी नगराध्यक्ष मा. सौ. योगिता ताई तुळनकर व . किशोर दिघे यांच्या हस्ते विधिवत लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष बाबाराव थुटे, नगरसेवक पिंटू बादले, प्रा. मेघश्याम ढाकरे, ह.भ.प. बाळकृष्ण काळे, माजी गटनेते मधुकर कामडी तसेच ह.भ.प. डॉ. विष्णुजी ब्राम्हणवाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी ह.भ.प. डॉ. विष्णुजी ब्राम्हणवाडे यांनी समाजप्रबोधनपर विचार मांडताना कै. शांताबाईंच्या सेवाभावी व मातृवत स्वभावाचा उल्लेख केला. “समाजासाठी केलेले कार्यच माणसाला अमरत्व देते,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना समाजसेवेची प्रेरणा दिली.

जामुनकर परिवारातील मदन जामुनकर, रवि जामुनकर, सुरेंद्र जामुनकर, नरेंद्र जामुनकर तसेच परिवारातील मुली, सुना व नातवंडे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मातोश्रींच्या स्मृती जागवताना परिवारातील सदस्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते.कै. शांताबाई जामुनकर यांनी आयुष्यभर साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाभिमुख विचार जपले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरू करण्यात आलेली ही शवशीतपेटी भविष्यात अनेक गरजू कुटुंबांना आधार देईल, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.समाजोपयोगी कार्यातून दिवंगत व्यक्तींच्या आठवणी जिवंत ठेवण्याचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने कै. शांताबाई जामुनकर यांना वाहिलेली भावपूर्ण आदरांजली ठरली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *