आ. समीरभाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी
हिंगणघाट, / प्रतिनिधी
प्रखर राष्ट्रप्रेमी, कुशल संघटक, एकात्म मानवतावादाचे प्रणेते तसेच अंतोदयाच्या विचारांचे अधिष्ठाते श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आज हिं
गणघाट येथे भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
स्थानिक आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात यानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा गौरव केला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानवतावादाचा विचार आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत अधिकच मार्गदर्शक ठरत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची संकल्पना म्हणजेच ‘अंतोदय’ असून, त्याच विचारांवर केंद्र व राज्य शासन कार्यरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष कुंटेवार, हिंगणघाट नगरपरिषदेचे गटनेते भूषण पिसे, नगरसेवक रवींद्र रोहनकर, संजय मगर, महेश वैद्य, रविकांत डोळसकर, प्रमोद कडवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. उपस्थित कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार समाजात अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.






