सामाजिक

गिमाटेक्स वणी युनिटच्या कामगारांकडून मृत सहकाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत


गिमाटेक्स वणी युनिटच्या कामगारांकडून मृत सहकाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत

हिंगणघाट : प्रतिनिधी 

गिमाटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, वणी युनिटमधील रिंगफ्रेम विभागात कार्यरत असलेले कामगार श्री. मारोती चामचोर (रा. आजंती) यांचे ३ डिसेंबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटात आधार देण्यासाठी कामगारांकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला.

वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार श्री. समिरभाऊ कुणावार आणि उपाध्यक्ष श्री. मिलिंदजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कामगार करारानुसार प्रत्येक कामगाराकडून पगारातून १०० रुपये कपात करून एकूण १ लाख ३६ हजार २०० रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली. ही रक्कम धनादेश स्वरूपात मृत कामगाराच्या कुटुंबाला देण्यात आली.

यासाठी संघटनेच्या वतीने फॅक्टरी मॅनेजर श्री. पठाण यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. पांडुरंग बालपांडे यांच्यासह दामोदर देशमुख, जीवन भानसे, जयंत बावणे, प्रशांत शेळके, राकेश तराळे, हेमंत भगत, विनोद कावळे, श्रावण थुटे, मनोहर जुमडे, विजय थुल, राहुल देशमुख, विनोद कोल्हे, लक्ष्मण जयपुरकर आदी उपस्थित होते.

कामगारांमधील एकोप्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *