समुद्रपूर भूषण शांताबाई देवरावजी जामुनकर यांचे निधन
समुद्रपूर भूषण शांताबाई देवरावजी जामुनकर यांचे निधन

तालुका प्रतिनिधी | समुद्रपूर
समुद्रपूर येथील सेवानिवृत्त शिक्षिका तथा समाजसेविका श्रीमती शांताबाई देवरावजी जामुनकर (वय ८९) यांचे आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यानंतरही त्यांनी समाजसेवेत सक्रिय सहभाग ठेवला होता. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत समुद्रपूर नागरिक सत्कार समितीच्या वतीने त्यांना ‘समुद्रपूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे.त्यांच्यावर उद्या दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता समुद्रपूर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






