१.७२ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; ग्रामीण भागात सुविधा वाढणार
१.७२ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; ग्रामीण भागात सुविधा वाढणार

समुद्रपूर: हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागात विकासकामांना गती देण्याच्या उद्देशाने आमदार समीर कुणावार यांच्या पुढाकारातून सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.मांडगाव येथे १५ लाख रुपये खर्चाचे समाजभवन, ५२ लाख रुपये खर्चाचा आष्टा रस्ता मजबुतीकरण, ३० लाख रुपये खर्चाचा चाकूर रस्ता, २५ लाख रुपये खर्चाचा रामनगर रस्ता तसेच २५ लाख रुपये खर्चाचा हरणखुरी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय खुरसापार येथील २० लाख रुपये खर्चाच्या समाजभवनाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमास भाजप जिल्हा सचिव संजय डेहणे, विधानसभा प्रमुख वामनराव चंदनखेडे, तालुकाध्यक्ष हेमंत राऊत, शेषराव तुळणकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश फुसे यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विकासकामांमुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून सामाजिक सुविधांमध्येही वाढ होणार आहे. विकासकामांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याच्या भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी आमदार कुणावार यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.






