राजकीय

भारतीय जनता पक्षाच्या वर्धा जिल्हा पंचायत राज व ग्रामविकास सेलचे गठन : जिल्हा संयोजकपदी प्रा. धर्मेंद्र राऊत यांची नियुक्ती


भारतीय जनता पक्षाच्या वर्धा जिल्हा पंचायत राज व ग्रामविकास सेलचे गठन : जिल्हा संयोजकपदी प्रा. धर्मेंद्र राऊत यांची नियुक्ती 

समुद्रपूर : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वर्धा जिल्हा पंचायत राज व ग्रामविकास सेलचे गठन करण्यात आले. या सेलच्या जिल्हा संयोजकपदी प्रा. धर्मेंद्र अरुणराव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष संजय गाते, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने आणि आमदार सुमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.या सेलमध्ये वर्धा लोकसभा संयोजक धिरज लेंडे, सहसंयोजक सुशील वडतकर, जिल्हा सहसंयोजक संदीप डोबले, जगदीश संचारीया, राजूभाऊ नौकरकर, अजय गांडोळे, जिल्हा मीडिया संयोजक विलास नवघरे व सहसंयोजक वैभव मुंगले यांचा समावेश आहे.तसेच विधानसभा संयोजक म्हणून आर्वी – गजानन भोरे, देवळी-पुलगाव – राजश्री गावंडे, हिंगणघाट – सचिन गावंडे आणि वर्धा – हरिष विरुळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चार विधानसभा मंडळ समित्याही गठीत करण्यात आल्या असून त्यामध्ये आर्वी शहर – राजाभाऊ वानखेडे, आर्वी – अशोक निकम, आष्टी – प्रविण ठाकरे, कारंजा – रमेश लोहकरे, सेवाग्राम – संजय नेहारे, वायगाव-अल्लीपूर – बंडूजी वालदे, देवळी ग्रामीण – गजानन हिवरकर, नाचणगाव – राहुल गायकवाड, देवळी शहर – प्रा. नरेंद्र मदनकर, पुलगाव शहर – मनोज खोंडे, हिंगणघाट शहर – दीपक चौधरी, हिंगणघाट ग्रामीण – छत्रपती वाघाफडे, समुद्रपूर शहर-हमदापूर – सौ. नलिनीताई थुटे, समुद्रपूर ग्रामीण – किशोर नेवल, शिंदी रेल्वे – मोहम्मद इमरान, वर्धा शहर – सौरभ देशमुख, सावंगी (मेघे) – अरुण ठाकरे, पवनार ग्रामीण – जगदीश वाघमारे, सेलू – सौ. दामिनी डेकाटे यांचा समावेश आहे.या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या-त्यांच्या मंडळातील गावांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *