शिक्षण-प्रशिक्षण

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत योगशिक्षक बाळू मुंडे यांचे घवघवीत यश


राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत योगशिक्षक बाळू मुंडे यांचे घवघवीत यश 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (पुणे) यांच्या वतीने आयोजित शिक्षक व अधिकारी/कर्मचारी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वर्धा जिल्ह्यातून पौर्णिमा धात्रक, सुषमा खोडे व बाळू मुंडे या तीन शिक्षकांची निवड झाली होती. त्यामध्ये गट ‘अ’ (वयोगट 25 ते 45 – पुरुष) या गटात आदर्श विद्यालय, पिंपळगाव (तालुका समुद्रपूर) येथे कार्यरत असलेले शिक्षक तसेच पतंजली योग परिवार, हिंगणघाट अंतर्गत निखाडे भवन येथे चालविण्यात येणाऱ्या दैनिक निशुल्क योग कक्षेचे योगशिक्षक बाळू बाबुराव मुंडे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत ९ वा क्रमांक प्राप्त केला व प्राविण्य मिळविले.

बाळू मुंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून योगसाधना, योगप्रचार व योगशिक्षण या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून शालेय शिक्षणासोबतच समाजात आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याचे कार्य करीत आहेत. नियमित योगाभ्यास, शिस्तबद्ध प्रशिक्षण व विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी ही त्यांच्या यशाची प्रमुख सूत्रे मानली जातात. राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे व चिकाटीचे फलित आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल हिंगणघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव, गटशिक्षणाधिकारी अशोक गिद्देवार, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, तसेच योगशिक्षक राहुल वंजारे, पंढरी तडस, विजय धात्रक, बाबाराव मस्कर, किशोर कुंभलकर, रणजीत जीवने, पौर्णिमा धात्रक, सावळे सर, राजेंद्र साबळे, कारमोरे सर, देवडे सर, माकोडे सर, कष्टी सर व संपूर्ण योगसाधक-योगसाधिका यांनी बाळू मुंडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *