सामाजिक

देशाला दिशा देणारा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता : प्रा. मनीष जगताप – गिरड येथे राष्ट्रसंतांच्या विचारांचा यज्ञ : सामाजिक परिस्थितीवर धोरणात्मक मंथन


देशाला दिशा देणारा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता : प्रा. मनीष जगताप
गिरड येथे राष्ट्रसंतांच्या विचारांचा यज्ञ : सामाजिक परिस्थितीवर धोरणात्मक मंथन


गिरड / बातमीदार
ग्रामगीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो देशाला दिशा देणारा राष्ट्रीय ग्रंथ आहे. ग्रामगीतेतील ४१ अध्यायांमध्ये सर्व धर्म, संत, थोर महापुरुष, देवी-देवतांचे साक्षप्रमाण देत राष्ट्रीय एकात्मतेचा, सामाजिक समतेचा आणि नैतिक मूल्यांचा संदेश दिला आहे. गावापासून देशाची परीक्षा हा संदेश आजच्या युगातील संजीवनी आहे. यासाठी ग्रामगीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे असे मत ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे जिल्हाध्यक्ष प्रा. मनीष जगताप यांनी व्यक्त केले. गिरड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५७ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त बहुआयामी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजीत केले होते. यावेळी ते बोलत होते. ग्रामगीतेतील विचार केवळ ग्रंथापुरते मर्यादित नसून ते प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याची गरज आहे. स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, व्यसनमुक्ती, शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचा अंगीकार करावा. गाव सक्षम झाले तरच राष्ट्र सक्षम होईल, हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार युवकांनी कृतीत आणावा, यातून आदर्श ग्रामसंस्कृती निर्माण होईल यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रा.मनीष जगताप म्हणाले यांनी केले.


राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे उद्घाटन गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक पुरुषोत्तम थुटे, शिक्षण सेवाव्रती सुषमाताई दुबे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सरपंच राजू नौकरकर, वैद्यकीय अधिकारी नितेश आत्राम, तंटामुक्ती अध्यक्ष राकेश चंदनखेडे, ठाणेदार विकास गायकवाड, जेष्ठ प्रचारक वामनराव झिंगरे, सामाजिक कार्यकर्ते महेश गौर, उपसरपंच मंगेश गिरडे, श्री राम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बळवंत गाटे, गाडगेबाबा देवस्थानचे अध्यक्ष कवडू वानोडे, माऊली देवस्थानचे अध्यक्ष मनोज गिरडे, गुरुदेव प्रचारक मनोज भांदककर , नूतन गिरडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


दैनदिन सामुदायिक प्रार्थना व चिंतन गुरुदेव प्रचारक उत्तम देवडे यांनी केले. हरिपाठ व हरिनाम गजर संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, श्रावण बाबा भजन मंडळ यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रीय प्रबोधनात्मक कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार जयश्री गावतुरे (चंद्रपूर) यांनी सादर केले. पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्य आयोजित ग्रामगीता – जीवन संजीवनी या विषयावर विदर्भस्तरीय खुली वकृत्व स्पर्धेत वेदांत भोयर (नागपूर), मानव रडके (शिरपूर), आराध्य गिरडे, आस्था चुटे, वेदायू लाजूरकर, उन्नती पानबुडे , कोमल वाढई यांनी अनुक्रमे पारितोषिक मिळविले. हुतात्मादिनानिमित्त राष्ट्रसंत रचित एकल भजन गायन स्पर्धेत हर्षल थुटे, साईनाथ मांडवकर (नागपूर), उत्तम आवडे (चिमूर), सचिन उंबरकर, स्नेहल लडके, बादल बोरेकर, नैतिक धोटे यांनी अनुक्रमे पारितोषिक पटकावले. आरोग्य व पर्यावरण विषयावर पोस्टर स्पर्धेत अनुष्का गिरडे, आयुष भांदककर, अथर्व शिवणकर, वैष्णवी वाघमारे, समीक्षा बावणे, आराध्य गिरडे, अक्षरा गलांडे यांनी बक्षिसे मिळविली. विदर्भस्तरीय दिंडी स्पर्धेत २५ गावातील वारकरी भजन मंडळांनी सहभाग घेतला होता.
संस्कार ज्ञानपीठ , समुद्रपुरच्या विद्यार्थ्यांनी हुतात्मादिनानिमित्त ‘गांधींचे करायचं काय या विषयावर नाटिका सादर झाली. शिवाय गाव गणराज्य, लोकशक्ती, महिला सक्षमीकरण, सामाजिक संघटन या विषयांवर संमेलन पार पडले.

३१ जानेवारी रोजी भव्य दिंडी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गोपालकाल्याचे कीर्तन कीर्तनकार सुरेश महाराज उदार (तेलंगना) यांनी केले. यावेळी विचारमंथन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण व सेवानिवृत्त शिक्षक दिलीप महाजन यांचा सन्मान करण्यात आला. राज्यातील सुप्रसिद्ध हास्य कवी गौतम गुड्ध्ये यांच्या एक रात्र कवितेच्या कार्यक्रमाने पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता करण्यात आली. आध्यात्मिक ,शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यक्रमाचे संचालन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष विष्णू ब्राह्मणवाडे यांनी केले . प्रास्ताविक भूमिका वैभव गिरडे यांनी मांडली. तर श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव संदीप शिवणकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रभाकर रोहनकर , चंद्रमणी ढेंगळे, गोपाल तेलरांधे, नितीन लाजूरकर, सौरभ शेळके ,वैभव अंडरस्कर, गौरव कावळे ,श्लोक लोजूरकर, साहिल सोनवणे,भूषण थुटे, मंथन भांदककर ,सचिन उंबरकर ,स्वप्नील रोहनकर ,प्रशांत लांडे ,बालू गलांडे, आराध्य गिरडे ,बादल बोरेकर , गोपीकृष्ण थुटे ,बंडू शेंडे ,भावेश ब्राह्मणवाडे ,श्लोक मिसाळ, रोशनी तेलरांधे ,पुनम ब्राह्मणवाडे ,संगीता देवतळे ,नंदिनी टिपले ,अर्चना बारोकर , रूपाली पानबुडे ,वैशाली गाठे , वैशाली ठक , वेदिका चामचोर ,मानसी चामचोर, कृष्णा गुंडे ,संजना पोफारे, भाग्यश्री वटे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *